सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी २०२४ सालापर्यंत
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोधात निवड करण्यात आली. महिनाभरापूर्वीच त्यांनी मुंबईत बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. बीसीसीआयचे अध्यक्षपदी निवड होणारे गांगुली हे केवळ दुसरे कर्णधार आहे.
तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीच्या निर्णयानुसार हा कार्यकाळ ठरवण्यात आला होता. पण हा नियम बदलण्याची मागणी करण्यात आली आणि सर्वोच्च न्यायालयानेही या गोष्टी परवानगी दिल्यामुळे आता सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी २०२४ राहण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.