फेसबुक लवकरच बंद करणार हे खास फिचर

Thote Shubham
जगातील सर्वात मोठी सोशल साइट फेसबुक लवकरच सर्वांच्या आवडीचे एक खास फिचर बंद करणार आहे. हे फिचर आहे लाइक्सचे. फेसबुकने लवकरच हे फिचर बंद करणार असल्याची घोषणा केली आहे.

आपण एखादा फोटो अथवा पोस्ट फेसबुकवर टाकल्यावर आपल्या फ्रेंड लिस्टमधील हजारो मित्र ती पोस्ट लाइक करतात. मात्र आता फेसबुक हे फिचर बंद करणार आहे.
तुमच्या फोटो, व्हिडीओ अथवा पोस्टला किती लाइक्स आल्या आहेत, कोणी लाइक्स केले आहे हे तुमच्या मित्रांना व अन्य युजर्सला ते दिसणार नाही.

युजर्स तुमची पोस्ट लाइक करू शकतील. मात्र तुमच्या अन्य मित्रांना व युजर्सला लाइक काउंट दिसणार आहे. फेसबुक लाइक काउंट हाइड म्हणजेच लपवणार आहे. हे फिचर्स कधी सुरू करण्यात येईल याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

लाइकमुळे युजर्सची पोस्टमधील रूची कमी होते. त्यामुळे युजर्संनी पोस्टच्या विषयावर अधिक लक्ष देण्यासाठी हे करण्यात येत आहे.

याआधी फेसबुकची मालकी हक्क असलेल्या इंस्टाग्रामवर देखील याआधी फोटो आणि व्हिडीओवरील लाइक्स आणि व्ह्यूवज युजर्सला दिसणे बंद करण्याचा प्रयोग सहा देशांमध्ये करत आहे.


Find Out More:

Related Articles: