लॉक डाऊन लागू झाल्यापासून 36,935 वाहने जप्त - गृहमंत्री अनिल देशमुख

Thote Shubham
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आलेला आहे. या काळात सर्व नियमांचे पालन करणे म्हणजे स्व व सामाजिक हिताचे संरक्षण होय, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.


हे निर्बंध वैयक्तिक तसेच सामाजिक हिताच्या साठीच करण्यात आलेले आहेत मात्र वारंवार सांगून, विनंती करुनही काही लोक नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. विनाकारण लॉक डाऊन दरम्यान बाहेर पडतात. याचा परिणाम कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव वाढवण्याकडे होऊ शकतो.

याची जाणीव संबंधित लोकांनी ठेवावी. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. लॉक डाऊन लागू झाल्यापासून ३६,९३५ वाहने जप्त करण्यात आली. तसेच एकूण रु. २ कोटी ६ लाख दंड आकारण्यात आला आहे.


याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले: "लॉक डाऊन पाळणं हे आपल्या सार्वजनिक हिताचं आहे. पोलीस सुद्धा माणूस आहे. स्वत:च्या सुरक्षेचं विचार न करता पोलीस कर्मचारी तासनतास अत्यंत विषम व प्रसंगी धोकादायक परिस्थिती मध्ये काम करत आहेत. नागरिकांनी प्रशासनाने दिलेली निर्देश मानावेत. पोलीस, आरोग्य कर्मचारी व प्रशासनाला घरी राहूनच सहकार्य करावं, असे आवाहन श्री.देशमुख यांनी केले.

Find Out More:

Related Articles: