कायद्याचा सन्मान राखला गेला, येथे कायद्याचे ‘राज्य’- सुप्रिया सुळे
मुंबई : निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. २०१२ मध्ये घडलेल्या प्रकरणानंतर संतापाची एक लाट देशभरात उसळली होती. अखेर निर्भयाच्या सहा पैकी चार दोषींना शुक्रवारी (20 मार्च) अखेर फासावर लटकविण्यात आले. गेल्या सात वर्षांपासून न्यायाची वाट पाहत असलेल्या दिल्लीतीत निर्भयाला न्याय मिळाला आहे.
यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली. ट्विटमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘कायद्याचा सन्मान राखला गेला. येथे कायद्याचे राज्य आहे, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, हा संदेश देणारी ही घटना आहे,’ असं ते म्हणाले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘या आरोपींची फाशी असे गुन्हे करणाऱ्या मानसिकतेला सणसणीत चपराक आहे. निर्भयाला श्रद्धांजली…,’ असं प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
दरम्यान, ‘निर्भयाच्या मारेकऱ्यांच्या शिक्षेला उशीर झाला. त्यांच्यावर दोषारोप कधीच सिद्द झाले होते. त्यामुळे शिक्षाही लवकर व्हायला हवी होती. असं असलं तरी उशीरा का होईना न्याय झाला. आपली न्याय व्यवस्था सक्षम आहे, हेच यातून सिद्ध झालंय, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवकत्या मनिषा कायंदे यांनी व्यक्त केली.