जितकं काम तितकाच पगार, ड्युटी पाच दिवस तर पगार पण पाचचं दिवसाचा – अमोल मिटकरी

Thote Shubham

बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक पार पडली. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोठी ‘गुड न्यूज’ दिली आहे. २९ फेब्रुवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

 

पाच दिवसांचा आठवडा करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागणीला ठाकरे सरकारनं अखेर मंजुरी दिली आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला. यावर आता ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री असणाऱ्या बच्चू कडू यांनी आक्षेप आहे. कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा मग ७ दिवसांचा पगार कशासाठी ? असा सवाल कडू यांनी विचारला आहे.

 

तसेच याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरी यांनी ट्वीट करत याबाबत भाष्य केलं आहे. ट्वीटमध्ये ते म्हणतात की, ‘जितकं काम तितकाच पगार असावा,’ असं माझे वैक्तिक मत आहे असे ते म्हणाले आहेत. तसेच पुढे ते म्हणतात, ‘सरकारी कामकाज करणाऱ्यांमध्ये पोलीस पण येतात, त्यांचा व शेतकऱ्यांचा कामाचा ताण कमी होईल असा एखादा निर्णय होणे गरजेचे. ड्युटी पाच दिवस तर पगार पण पाचचं दिवसाचा,’ असे मिटकरी म्हणाले.

 

दरम्यान, सरकारी नोकरदारांना यापुढे दर शनिवार-रविवार सुट्टी मिळणार आहे. केंद्राच्या धर्तीवर आता राज्यातही पाच दिवसांचा आठवडा करण्याला बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. पाच दिवसांचा आठवडा व्हावा यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले होते. त्यानुसार आता निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २९ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

 

 

Find Out More:

Related Articles: