उद्या शेतकरी कर्जमाफीची घोषणा करु शकतात उद्धव ठाकरे

Thote Shubham

मुंबई – उद्या शिवछत्रपतींचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार असून त्यावेळी अवघ्या राज्याच्या शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जमाफीची घोषणा करु शकतात असे संकेत मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर हा पहिलाचा दौरा आहे. उद्धव ठाकरे त्याचबरोबर एकवीरा देवीच्या दर्शनालाही जाणार आहेत.

 

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकी दरम्यान शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर मी स्वत: शिवनेरीवर जाणार, शिवाय कुलदैवत एकवीरेचेही दर्शन घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे हा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांना लवकरच भरीव मदत देणार असल्याचे जाहीर केले होते.

 

महाविकास आघाडीचा शेतकऱ्यांना तुटपुंजी नाही तर लवकरच भरीव मदत करण्याचा निर्धार असून त्यासाठी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजना व त्यांच्या अंमलबजावणीचा वास्तववादी लेखाजोखा मंत्रिमंडळासमोर सादर करण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर जाहीर केले होते.

 

सुमारे ६० हजार कोटी रुपयांहून अधिक निधी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीच्या महत्त्वाकांक्षी सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी लागणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारलाही हा निधी कर्जरूपानेच उभारावा लागणार असल्याने सुमारे पावणेपाच लाख कोटी रुपये कर्जाचा बोजा मोठय़ा प्रमाणावर वाढणार आहे.                            

Find Out More:

Related Articles: