भाजप खासदाराने बाबासाहेब आंबेडकरांशी केली नरेंद्र मोदींची तुलना

Thote Shubham

नवी दिल्ली – सध्या देशभरात भाजपमधील ओबीसी समाजातील नेत्यांवर अन्याय होत असल्याच्या उलटसुलट चर्चा असतानाच भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी या पार्श्वभूमीवर ओबीसी वर्गाला भाजपत आजिबात डावलले जात नसल्याचे म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसी वर्गाला संविधानिक अधिकार मिळवून दिल्यामुळे नरेंद्र मोदी हे ओबीसींचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असल्याचे म्हणत साबळे यांनी मोदींचे कौतुक केले आहे. यासंदर्भातील वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

 
 

साबळे म्हणाले, आपण एससी, एसटी नागरिकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिले होते, त्यांनी हे आश्वासन पाळले आहे. त्यानुसार, एससी, एसटी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण १० वर्षांसाठी वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय त्यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला.

 

या वर्गांना लोकसभा आणि राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे या भावनेने संविधानात आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यांत २००९ मध्ये वाढवलेल्या या राजकीय आरक्षणाची मुदत संपत असल्याने मोदी सरकारने ती पुन्हा दहा वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतल्याचेही साबळे यावेळी म्हणाले.                                                                     

Find Out More:

Related Articles: