शरद पवारांचा कुटुंबातील गद्दारांसह मोदी-शहांशी लढा - सुप्रिया सुळे

frame शरद पवारांचा कुटुंबातील गद्दारांसह मोदी-शहांशी लढा - सुप्रिया सुळे

Thote Shubham
मुंबई : आपल्या व्हाट्सअप स्टेटसमध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की , “ते हरतील किंवा जिंकतील पण शरद पवार एक मराठा लढवय्याप्रमाणे या युद्धात लढत आहेत. त्यांचे वय आणि आरोग्य आणि मोदी-शहांचे राजकारण, कुटुंबातील गद्दारी किंवा त्यांनी वेळोवेळी सर्वांवर मात दिली आहे. अशी इच्छाशक्ती मी कधीच ऐकली नाही.”

असे म्हणत मुलगी म्हणून त्यांना अभिमान आहे असे मत व्यक्त केले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या २३ नोव्हेंबरपासून व्हाट्सअप स्टेटसवरून महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितींचा उलगडा होत आहे. आज सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांबद्दल आदर व्यक्त करत अजित पवारांवर टीका केली.

याआधी सुप्रिया यांनी, “I believe…power comes and goes…only relationship matter…” असे स्टेट्स ठेवले आहे. सुप्रिया यांनी म्हटले आहे की, मला वाटते की सत्ता येते जाते, मात्र नाती कायम राहतात, असे म्हणत त्यांनी आपले दु:ख व्यक्त केले आहे. यावरून पवार कुटुंबात फूट पडल्याचे त्यांनी मान्य केल्याचे यावरून दिसते.                        

याआधी त्यांनी, “माझ्या आयुष्यातले सध्या कठीण प्रसंग आहेत. हे प्रसंग मला मजबूत करत आहेत. प्रत्येकाचे आभार ज्यांनी कठीण प्रसंगी मला साथ दिली. ” असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचेही आभार मानले.

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More