भाजपाचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात - जयंत पाटिल

Thote Shubham
मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचे सरकार येण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये गेलेले अनेक आमदारांना आता परतीचे वेध लागले आहेत. भाजपाचे जवळपास १५ ते २० आमदार संपर्कात असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दिली जात आहे.

भाजपाने १०५ जागा जिंकल्या आहेत, मात्र महायुतीतील शिवसेनेने भाजपाबरोबर सरकारमध्ये सहभागी न होण्याची भूमिका घेतल्यामुळे भाजपाला सरकार स्थापन करता आलेले नाही. मात्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज्यात पुन्हा भाजपाचेच सरकार येणार असल्याचे सांगत आहेत.
 
भाजपाकडे अपक्षांसह ११९ आमदारांचे संख्याबळ आहे. या संख्याबळाच्या जोरावर आम्ही राज्यात सरकार स्थापन करू, असा दावा भाजपा नेते करीत असले तरी राष्ट्रवादीकडून भाजपाला धक्का देण्याचेही प्रयत्न सुरू झाले आहेत.

 राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपाचेच १५ ते २० आमदार संपर्कात असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र येत आहेत. आमच्यात चर्चा सुरू असून पाच वर्षे स्थिर सरकार राहण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न कसे सोडवता येईल याचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.                       


Find Out More:

Related Articles: