भाजपाकडून बड्या दिग्गजांना मोठा धक्का, विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर

Thote Shubham
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने शर्यतीत असलेल्या उत्सुक नेत्यांना धक्का दिला आहे. निष्ठावंतांना पुन्हा एकदा डावलल्याचं चित्र आहे.

विधानपरिषदेसाठी भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

भाजपाकडून पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच पुनर्वसन करण्यात येईल अशी शक्यता होती. मात्र भाजपकडून यांना डावलण्यात आल्याचं समोर आलं आहे. भाजपात नाराजी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण अनेकांनी विधानपरिषदेसाठी उमेदवारी मागितली होती.

दरम्यान भाजपचे चारही उमेदवार विधानभवनात दाखल झाले आहेत. आजच भाजपचे हे चारही उमेदवार दुपारी 2 वाजता फॉर्म भरणार आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज भरला जाणार आहे. 

 

Find Out More:

Related Articles: