पी चिदंबरम यांना तिहार जेलमध्ये ईडीकडून अटक

Thote Shubham

अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. पी चिदंबरम यांची तिहार जेलमध्ये ईडीच्या तीन सदस्यांच्या टीमकडून चौकशी करण्यात आली. पी चिदंबरम यांची चौकशी जवळपास एक तास सुरु होती.

पी चिदंबरम यांना चौकशीनंतर अटक करण्यात आली. पी चिदंबरम यांची चौकशी तसेच अटकेची परवानगी मंगळवारी विशेष न्यायालयाने ईडीला दिली होती. पी चिदंबरम मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ५ सप्टेंबरपासून तिहार जेलमध्ये आहेत.

ईडीचे पथक आज सकाळी पी चिदंबरम यांची चौकशी करण्यासाठी तिहार जेलमध्ये पोहोचले होते. पी चिदंबरम यांची चौकशी जवळपास एक तास सुरु होती. चिदंबरम यांचा मुलगा आणि काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम आई नलिनसोबत यादरम्यान पोहोचले होते. पी चिदंबरम यांच्या अटकेची मागणी ईडीने केली होती. यावर न्यायालयाने त्यांना चौकशीची परवानगी दिली. तसेच चौकशीदरम्यान हाती लागलेल्या माहितीच्या आधारे अटक करण्याचा निर्णय ईडी घेऊ शकते असेही सांगितले होते.

निर्णय सुनावताना विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी सांगितले होते की, जर मनी लॉण्ड्रिंग प्रकरणातील आरोपीविरोधात सबळ पुरावे असतील तर अटकेची कारवाई ईडी करु शकते. न्यायालयाने यामध्ये मध्यस्थी करण्याची गरज नाही. पण एखाद्या प्रकरणात आरोपी आधीच अटकेत असेल तर चौकशीसाठी परवानगी घेणे गरजेचे आहे. पुढे त्यांनी सांगितले होते की, न्यायालयाच्या परवानगीसोबतच अशा चौकशीदरम्यान अटक करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तर तसे केले जाऊ शकते.


Find Out More:

Related Articles: