पाकिस्तानातून आल्यापासून आर्मीकडून छळ, धुळ्याचा जवान चंदू चव्हाणचा राजीनामा

Thote Shubham

पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झालेले भारतीय लष्कराचे जवान चंदू चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून राजीनामाला दिल आहे. चंदू चव्हाण यांनी याबाबतचा एक व्हीडिओ नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी मी लष्करातील अधिकाऱ्यांचा त्रासाला कंटाळून असून राजीनामा देत असल्याचे म्हटलं आहे. मात्र चंदू चव्हाण यांचे हे आरोप लष्काराने फेटाळले आहेत.

लष्काराने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, “चंदूच्या विरोधात जवळपास पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच याबाबतच त्याच्या गुन्ह्याखाली कारवाईही सुरु आहे. काही निवडणुकांमध्ये चंदू हे राजकीय पक्षांना समर्थनार्थ प्रचार केल्याचेही समोर आले होते.” याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

चंदू चव्हाण यांची काही वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झाली होती. “मी लेखी स्वरुपात माझ्या वरिष्ठांकडे राजीनामा दिला आहे. मला गेल्या तीन वर्षांपासून अनेक समस्या लेखी स्वरुपात दिल्या आहे. मला पोस्ट हवी आहे आणि मला घरी जायचं आहे, असही मी सांगितलं. मात्र माझं कोणीही ऐकलं नाही.” अशी तक्रार करत चंदू यांनी डी. एम. रेजिमेंट श्रीमान कमान अधिकारी यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे.

चंदू चव्हाण हे धुळ्यातील बोरविहीरी गावातील रहिवासी आहेत. चंदू चव्हाण हे 29 सप्टेंबर 2016 रोजी नजरचुकीमुळे भारत-पाकिस्तान सीमेवरील नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेले होते. त्यानंतर तब्बल 3 महिने 21 दिवसांनी म्हणजेच 21 जानेवारी 2016 रोजी त्यांची सुटका झाली होती.


Find Out More:

Related Articles: