अमित शाहा यांचा 26 सप्टेंबरचा मुंबई दौरा रद्द, शिवसेना-भाजप युतीचा फॉर्म्युला दिल्लीत ठरणार?

frame अमित शाहा यांचा 26 सप्टेंबरचा मुंबई दौरा रद्द, शिवसेना-भाजप युतीचा फॉर्म्युला दिल्लीत ठरणार?

Thote Shubham

भाजप पक्षाचे अध्यक्ष अमित शाहा  यांच्या येत्या 26 सप्टेंबरचा मुंबई दौरा रद्द झाला आहे. तर अमित शहा यांचा मुंबई दौरा झाला असता तर शिवसेना-भाजप युतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता अमित शाह यांचा दौरा रद्द झाल्याने युतीबाबत निर्णय लांबवणीवर गेला आहे. परंतु अमित शाह यांचा दौरा रद्द झाल्याने युतीबाबत प्रश्नचिन्ह आता उपस्थित राहिले असल्याचे बोलण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी शिवसेनेसोबत युती झाल्यास50-50 जागा वाटपाचा फॉर्म्य़ुला ठरवला जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याचा तिढा सुटलेला नाही. त्यातच आता अमित शहा यांचा मुंबईतील दौरा रद्द झाल्याने जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन चर्चा सुरु झाली आहे.

तर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार युतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला दिल्लीत ठरवला जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र कोणत्या दिवशी जागा वाटपाबद्दल निर्णय जाहीर होईल हे सांगण्यात आलेले नाही.

परंतु काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शिवसेनेला विधानसभा निवडणूकीसाठी 144 जागा न दिल्यास युती करणार असल्याचे धक्कादायक विधान केले होते. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना-भाजप युतीच्या जागा वाटपावरुन आज मोठे विधान केले आहे.

तर वृत्तसंस्थेसोबत बोलताना त्यांनी असे म्हटले की, "भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विभाजनापेक्षा युतीत जागा वाटपाचा निर्णय अधिक कठीण आहे. जर शिवसेना सत्तेत सामिल होण्याऐवजी विरोधात असते तर, आज परिस्थिती वेगळी असते. परंतु भाजप-शिवसेना यांच्यात काहीही निर्णय होईल, तो आपल्याला कळवला जाईल". तर महाराष्ट्रात एकूण 288 मतदारसंघ आहेत यापैकी 44 जागा या युतीशी संलग्न मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार आहेत,

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More