पी. चिदंबरम यांच्या कोठडीत 3 ऑक्टोबरपर्यंत वाढ

Thote Shubham

आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज, गुरूवारीही कोर्टात दिलासा मिळाला नाही. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 3 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

त्यामुळे अजून 14 दिवस तिहार जेलमध्ये रहावे लागणार आहे. चिदंबरम यांना राउज एव्हेन्यू संकुलातील कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी हा निर्णय देण्यात आला.

पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी 21 ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली होती. त्याआधी त्यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात प्रकट होत आपण याप्रकरणात निर्दोष असल्याचा दावा केला होता.

घरी पोहोचल्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी भिंतीवरून उडी मारून घरात प्रवेश घेत त्यांना अटक केली होती.

त्यानंतर आधी २६ ऑगस्टपर्यंत व नंतर ३० ऑगस्ट, त्यानंतर २ सप्टेंबर, व १९ सप्टेंबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना राउज एव्हेन्यू संकुलातील कोर्टात हजर करण्यात आले होते. तिथे त्यांना ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.                                                                                                  


Find Out More:

Related Articles: