सगळी पदे भोगून झाली, आता मुख्यमंत्रिपदा चा विचार करणार : रावसाहेब दानवे
आपल्या भाषाशैलीमुळे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे कायम चर्चेत असतात. ते जे बोलतात त्यावरून वाद आणि चर्चा होत राहते. आता येत्या काळात मुख्यमंत्रिपदाबाबत विचार करणार असल्याचे सूचक वक्तव्य दानवे यांनी केले आहे. जालन्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमावेळी एका समर्थकाने जालन्याचा मुख्यमंत्री हवा आहे, अशी मागणी केली. यावेळी दानवे यांनी आपल्या स्टाईलने उत्तर देत, सरपंचापासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सगळी पदे भोगून झाली. आता कोणतीही अपेक्षा राहिली नाही. परंतु मुख्यमंत्रिपदाबाबत पुढे विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दानवे यांनी विधानसभा निवडणुकीचे देखील भाकीत केले आहे. राज्यात १३ सप्टेंबरपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार त्यांनी सांगितले. साधारण १५ ऑक्टोबरच्या आसपास मतदानप्रक्रिया पार पडेल.