मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंठा वॉटर ग्रीड योजनेचे उद्घाटन, तब्बल 173 गावांमध्ये होणार शुद्ध पाणीपुरवठा
मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थितीवर उपाय म्हणून दुष्काळ मुक्तीच्या संकल्पने अंतर्गत मराठवाडा वॉटर ग्रीड योजना मांडण्यात आली होती. तर आज या बहूउदेशिय योजनेच मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यात सुरु करण्यात येणाऱ्या परतूरा मंठा वॉटर ग्रीड योजनेच्या मदतीने तब्बल 173 गावांमध्ये शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे.
या योजनेतील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता प्रतिदिन 320 लाख लिटर आहे, तर यासाठी आलेला खर्च 248.69 कोटी आहे. पुढील 20 वर्षांच्या लोकसंख्येच्या अंदाजाने या योजनेची आखणी करण्यात आली आहे. याचं काम स्काडा यंत्रमाद्वारे ऑटोमॅटिक होणार असून त्याचं नियंत्रण हे एकाच ठिकाणी असेल.
अनियमितपणे पडणारा पाऊस, जलपातळीत वारंवार होणारी घट, पाणीसाठ्याचं कमी होत असलेलं प्रमाण, टॅंकर्सच्या मागणीत होणारी वाढ त्याचप्रमाणे 2016 साली लातूर शहरात रेल्वेद्वारे करण्यात आलेला पाणीपुरवठा यासर्व अडचणी लक्षात घेता मराठवाड्यात वॉटर ग्रीड निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान महाराष्ट्रात भाजपच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सध्या सुरु आहे. आज महाजनादेश यात्रा जालना जिल्ह्यात पोहोचली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे दिग्गज नेते महाराष्ट्र दौरा करत आहेत, त्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी या जलशुद्धीकरण केंद्राचे रिमोटद्वारे ई-उदघाटन केले.