एकनाथ खडसेंनी व्यक्त केली ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा

लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहे. त्यामुळे सगळेच पक्ष आता मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत. तसेच इच्छुक उमेदवारही कार्यकर्त्यांच्या बैठका, सभा आणि मेळावे घेण्यात व्यस्त आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

एकनाथ खडसे यांनी ‘मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्यावतीने सध्या रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या नावाची चर्चा असली तरी या मतदारसंघातून मीच इच्छुक आहे आणि पक्षाकडे मीच उमेदवारीची मागणी करणार आहे’ असे खुद्द माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले आहे. त्यामुळे या जागेची उमेदवारी आता कुणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा जळगाव जिल्ह्यात आहे. परंतु यावेळी खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे – खेवलकर यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा रंगली होती. परंतु आता खुद्द खडसे यांनीच या जागेवर दावेदारी केली असल्याने यात आता चुरस वाढली आहे. याविषयी खडसे यांनी ‘पक्ष जो निर्णय घेईल, तो घेईल, मात्र या मतदार संघातून मीच इच्छुक आहे असं विधान केले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार पक्षांतर झालेले आहे. त्यामुळे याविषयी बोलताना ‘भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या सध्या मोठी आहे पक्षात येणाऱ्यांची निष्ठा तपासल्यास निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही. तसेच पक्षात येण्यापूर्वी नेत्यांची निष्ठा तपासा असं खडसे म्हणाले


Find Out More:

Related Articles: