सावधान ! नॉईज कॅन्सलेशन हेडफोन ठरू शकतात धोकादायक

Thote Shubham

सध्या ब्लूटूथ आणि वायरलेस डिव्हाईसचा ट्रेंड आहे. मागील काही वर्षात इअरफोन आणि हेडफोनचा वापर अधिक होत असे. मात्र आता हेडफोन आणि इअरफोन ब्लूटूथच्या साहय्याने चालतात. कंपन्या हे हेडफोन अथवा इअरफोन नॉईज कॅन्सलेशन फीचरसोबत बाजारात लाँच करत आहेत. या फीचरबद्दल दावा करण्यात येत आहे की, या हेडफोनद्वारे तुम्हाला जे हवे आहे तेवढेच ऐकायला येईल.

 

मात्र हे नॉईज कॅन्सलेशन हेडफोन्स सर्वांसाठी योग्य नाहीत. अनेकांसाठी हे हेडफोन त्रासदायक असतात. यामूळे कानात दुखत असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या आहेत. याशिवाय हेडफोन काढल्यानंतर त्यांना बाहेरचा आवाज येत नसल्याचे देखील अनेकांनी सांगितले. अनेक लोकांचे म्हणणे आहे की, हेडफोनच्या अधिक वापरामुळे कानाच्या पडद्यांवर अधिक ताण पडतो.

 

कानाचा हा त्रास हळूहळू डोक्यापर्यंत पोहचतो. अनेक हेडफोनमध्ये नॉईज कॅन्सलेशन फीचर बंद करण्याचा देखील पर्याय देण्यात आलेला आहे. या हेडफोनद्वारे कानावर पडणारा एअर प्रेशर मोजण्यासाठी काहीही सुविधा नाही. मात्र बोस सारख्या कंपन्या नॉईज  कॅन्सलेशन एडजस्ट करण्याची सुविधा देतात. त्यामुळे युजर्स 0 ते 10 तक आपल्या सोयीनुसार सेट करू शकतात.

खरेदी करताना सावध –

नॉईज कॅन्सलेशन हेडफोन खरेदी करताना एडजस्टेबल एक्टिव नॉईज कंट्रोल फीचर आहे का तपासा. हेडफोनच्या जागी एअरबड्स अथवा नेकबँड चांगले असतात.

Find Out More:

Related Articles: