आणखी एका अभिनेत्रीसाठी गॉडफादर बनला भाईजान

Thote Shubham

आतापर्यंत अनेक कलाकारांना बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने अभिनय क्षेत्रात आपले वर्चस्व स्थापन करण्याची संधी दिल्यामुळे त्याला दबंग शिवाय सिनेसृष्टीचा गॉडफादर म्हणून देखील ओळखले जाते. अनेक नवख्या कलाकारांसाठी त्याने बॉलिवूडचे दालन उघडे करून दिले आहे. तो आता पुन्हा एका ब्राझीलियन अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये दाखल करण्यासाठी सज्ज झाला आहे.

लॅरिसा बोन्सी असे या ब्राझीलियन अभिनेत्रीचे नाव असून यासंदर्भात अद्याप कोणत्याही प्रकारचा अधिकृत खुलासा सलमानने केलेला नाही. परंतु सलमानसोबत एक फोटो लॅरिसाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये सलमान खानसोबत काम करण्याची संधी मला मिळाल्यामुळे फार आनंदी असल्याचे म्हटले आहे. सलमान सध्या त्याच्या आगामी ‘राधे’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. सलमानसोबत या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारताना अभिनेत्री दिशा पटनी दिसणार आहे.                                                                                                                                                  

 

Find Out More:

Related Articles: