यामुळे सनी लिओनला आवडतो महेंद्र सिंह धोनी
बॉलीवूडची बेबी डॉल अर्थात सनी लिओनचे क्रिकेट प्रेम सर्वश्रृत आहे. दरम्यान नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला आवडणाऱ्या क्रिकेटपटूच्या नावाचा उल्लेख केला आहे. तिच्या क्रिकेटपटूची आवडही एकदम हटके आहे आणि तो क्रिकेटपटू आवडण्यामागे कारणही तसे वेगळे आहे.
जेव्हा तिच्या आवडत्या क्रिकेटपटूबद्दल सनीला विचारण्यात आले तेव्हा तिने एक झटक्यात महेंद्र सिंग धोनीचे नाव घेतले आणि त्याचबरोबर तो का आवडतो या मागील कारण देखील तिने सांगितले.
धोनी आवडण्यामागील सनीने सांगिलेले कारणही खूप सुंदर होते. मला धोनी आवडतो कारण त्याच्याकडे एक खूप क्यूट मुलगी असल्याचे ती म्हणाली. झिवासोबतचे अनेक फोटो धोनी शेअर करत असतो आणि ते दोघेही एकत्र खूप निरागस दिसतात. सनी पुढे म्हणाली धोनी माझा आवडता क्रिकेटपटू असण्याचे आणखी एक आणि मुख्य कारण म्हणजे तो एक परफेक्ट फॅमिली मॅन आहे.
सध्या दोन टीव्ही शो सनी करत आहे. त्याचबरोबर तिच्याकडे एक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट आहे. यापैकी हिंदी चित्रपट तिच्या प्रॉडक्शन बॅनरखाली बनत आहे. ‘सनी सिटी मीडिया अँड एंटरटेनमेंट’ नावाचे प्रॉडक्शन हाऊस सनीने सुरू केले असून ती निर्माती म्हणून तिच्या जबाबदाऱ्या एंजॉय करत आहे.