उद्या चुकूनही कोणाला ‘एप्रिल फूल’ करु नका, अन्यथा खावी लागेल जेलची हवा

Thote Shubham

पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना अफवा पसरवू नये, असे आवाहन पुणे जिल्ह्यातील बारामतीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केले आहे. उद्या १ एप्रिल असून त्यानिमित्ताने कोणाला ‘एप्रिल फूल’ करु नका, भीतीचे वातावरण तयार करु नका, अन्यथा जेलची हवा खावी लागेल.

 

नागरिकांकडून एक एप्रिल निमित्त वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज एप्रिल फुल करण्या करिता टाकले जाऊ शकतात, यात जमाव बंदी उठली आहे, सर्व लोक रस्त्यावर एकत्र यावे अशा स्वरूपाचे मेसेज सोशल मीडियावर येण्याची शक्यता आहे. अशा एप्रिल फूलसाठी सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजवर कोणीही बळी पडू नये अन्यथा लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या तसेच लोकांच्या अडचणी ‘एप्रिल फूल’ केल्यामुळे वाढण्याची शक्यता आहे. जर अशा स्वरूपाचे मेसेज लोकांकडून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास व्हायरल करणाऱ्या विरुद्ध तसेच त्या ग्रुप ॲडमिन विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी म्हटले आहे. तसे लिखित स्वरूपाचे पत्रक ही त्यांनी काढले आहे.

कोरोना व्हायरसचे देश आणि राज्यावर संकट आहे. कोणीही लोकांना घाबरविण्याचा किंवा त्यांची फसवणूक करु नका. विनाकारण प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि लोकांवर ताण येऊ शकतो. त्यामुळे १ एप्रिलला ‘एप्रिल फूल’ न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.

Find Out More:

Related Articles: