डेटॉलमुळे खरचं नष्ट होतो का कोरोना व्हायरस ?

Thote Shubham

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहेत. या सोबत अनेक अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहे. यातच डेटॉल कोरोनाचा व्हायरस नष्ट करू शकतो, असा दावा करण्यात करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. डेटॉलच्या प्रोडक्टचा फोटो शेअर करत या संदर्भात माहिती शेअर करण्यात येत आहे.

 

शेअर करण्यात आलेल्या प्रोडक्ट्सच्या लेबलवर मॅन्युफॅक्चरिंगची तारीख वर्ष 2019 आहे. त्यामुळे या व्हायरसबाबत कंपनीला आधीच कसे माहिती होते ? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडत आहे.

 

डेटॉल प्रोडक्ट्स बनवणारी कंपनी रेकिट बेकिंजरने मात्र याबाबत खुलासा केला आहे. एका युजरला उत्तर देताना कंपनीने सांगितले की, त्यांचे प्रोडक्ट्स MERS-CoV आणि SARS-CoV सारख्या कोरोना व्हायरसवर प्रभावी आहेत. मात्र नवीन कोव्हिड-19 व्हायरसवर याचा प्रयोग करण्यात आलेला नाही. त्यामुळे नवीन व्हायरसवर आमच्या प्रोडक्ट्सचा कसा परिणाम होतो, हे आम्ही सांगू शकत नाही.

 

थोडक्यात, डेटॉलमुळे कोरोना व्हायरस नष्ट होतो, हे स्पष्ट झालेली नाही. कारण अद्याप कोरोना व्हायरस संदर्भात डेटॉलच्या कोणत्याही प्रोडक्टची चाचणी करण्यात आलेली नाही.                                                                                               

 

Find Out More:

Related Articles: