
ऍन्टिबायोटिक्स घेताना सावधान
आयुर्वेदाचे औषध घेतले की औषधासोबत पथ्यपाणी फार आवश्यक असते. ऍलोपथीमध्ये मात्र पथ्याची भानगड नाही असे मानले जाते आणि ते खरेही आहे. परंतु जेव्हा एखादा रुग्ण ऍन्टिबायोटिक्स औषधे घेतो तेव्हा त्याने काही पथ्ये पाळली पाहिजेत, विशेषतः खाण्याची पथ्ये पाळली पाहिजेत. असा इशारा तज्ञा डॉक्टरांनी दिला आहे.
सध्याच्या आधुनिक वैद्यकीय उपचारामध्ये ऍन्टिबायोटिक्स औषधे मोठ्या प्रमाणावर दिली जातात. परंतु प्रत्येकाला त्याचा गुण म्हणावा तसा येतोच असे नाही. खाण्याची पथ्ये न पाळल्यामुळे काही ऍन्टिबायोटिक्स औषधांचा परिणाम कमी होतो. म्हणून त्यांना म्हणावा तसा गुण येत नसतो.
अशी औषधे सुरू असताना दूध पिणे किंवा दुग्धजन्य पदार्थ खाणे घातक असते. असे पदार्थ अशी औषधे सुरू असलेल्या रुग्णाला डायरिया होण्यास कारणीभूत ठरू शकतात. तसाच प्रकार अल्कोहोलच्या बाबतीत होतो.
एका बाजूला ऍन्टिबायोटिक औषधे सुरू असताना दुसर्या बाजूला भरपूर मद्य प्राशन सुरू असेल तर चक्कर येऊ शकते आणि ऍन्टिबायोटिक औषधांचा परिणाम सौम्यपणे होऊ शकतो. म्हणजे गुण उशिरा येऊ शकतो. टोमॅटो, लिंबू, चॉकलेट किंवा द्राक्षासारखे आंबटपणा असलेली फळे आणि शितपेेये यांच्याही प्राशनाने ऍन्टिबायोटिक औषधांचा परिणाम घटतो.
आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी आम्ही घेत नाही.