...या कारणामुळे धोनी क्रिकेटपासून दूर
इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार, यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी क्रिकेटपासून लांब आहे. वर्ल्डकपनंतर हिंदुस्थानचा संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेला आणि आता घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करत आहे.
या दोन्ही मालिकेमध्ये धोनी दिसला नाही. तसेच आफ्रिकेनंतर बांग्लादेशविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेतही धोनी दिसणार नाही. धोनीने नोव्हेंबरपर्यंत सुट्टी वाढवून घेतली आहे. धोनी विश्रांती घेत असल्याने क्रिकेटपासून दूर असल्याचे बोलले जात होते, परंतु आता वेगळीच शक्यता व्यक्त केली जात आहे.
धोनी बराच काळ क्रिकेटपासून दूर असलयाने त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू आहेत. धोनीने आपला अखेरचा सामना विश्वचषकामध्ये खेळला होता. यानंतर तो मैदानावर उतरलेला नाही. यादरम्यान धोनीने लष्करामध्ये सेवाही केली. परंतु आता धोनीबाबत एक वेगळीच बातमी आली असून वर्ल्डकपदरम्यान त्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळेच क्रिकेटपासून दूर गेला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने बीसीसीआय सूत्रांच्या हवाले याबाबत वृत्त दिले आहे.
वर्ल्डकपदरम्यान धोनीच्या पाठीला दुखापत झाली होती आणि यादरम्यान ती वाढली. या दुखापतीसोबतच त्याने वर्ल्डकप खेळला. पाठीच्या दुखापतीसह त्याच्या मनगटालाही दुखापत झाली होती. या दुखापतींच्या कारणांमुळे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पुनरागमन लांबले आहे, असे बोलले जात आहे.