SBI चे गृह, वाहन आणि अन्य कर्ज स्वस्त होणार

Thote Shubham

स्टेट बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडवर आधारित एमसीएलआरच्या कर्ज दरात ०.१० टक्क्यांनी कपात केली. नवीन दर १० डिसेंबरपासून लागू होणार आहेत. यामुळे एसबीआयच्या एमसीएलआरशी संबंधित असलेली गृह, वाहन आणि अन्य कर्ज स्वस्त होणार आहेत.

 

एमसीएलआरशी संबंधित असलेल्या सर्वांनाच लगेच दर कपातीचा फायदा मिळणार नाही. ते रीसेट डेटवर अवलंबून असेल. एमसीएलआर आधारित कर्जांमध्ये रीसेट पीरियड एक वर्षांचा असतो. ज्या ग्राहकांची रीसेटची तारीख १० डिसेंबर किंवा त्यानंतर आहे त्यांना फायदा मिळेल.
 
 
रीसेटची तारीख निघून गेली असेल, तर त्यांना वाट पाहावी लागेल. १० डिसेंबर किंवा त्यानंतर ग्राहकांनी एमसीएलआर आधारीत कर्जाचा पर्याय स्वीकारला तर त्यांना घटवलेल्या व्याजदराचा फायदा मिळेल.
 
 
 

Find Out More:

Related Articles: