जगातील टॉप टेन श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी नववे स्थान पटकावले आहे. गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांना अंबानींनी मागे टाकले आहे. फोर्ब्जच्या अब्जाधीशांच्या रिअल टाइम यादीनुसार, 6070 कोटी डॉलर (4.33 लाख कोटी रु) इतकी अंबानींची संपत्ती आहे. तर लॅरी पेज यांची संपत्ती 4.25 लाख कोटी रुपये असून ते यादीच 10 व्या स्थानावर आहेत. तसेच सर्गे ब्रिन यांची संपत्ती 4.10 लाख कोटी असून ते 11 व्या क्रमांकावर आहेत.
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असण्यासोबतच ते आशियातील देखील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मागील वर्षी अलिबाबा या कंपनीचे संस्थापक जॅक मा यांना मुकेश अंबानी यांनी मागे टाकले होते. अंबानी यांची ‘रिलायन्स’ ही कंपनी 10 लाख कोटी रुपयांचे भांडवल असणारी देशातील पहिली कंपनी आहे.
फोर्ब्जने जाहीर केलेल्या यादीनुसार, पहिल्या स्थानावर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे असून त्यांची एकूण संपत्ती 8 लाख कोटी एवढी आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत बेजोस हे अव्वल स्थानावर आहेत. तर एलव्हीएमएच कंपनीचे मालक बर्नार्ड अरनॉल्ट फॅमिली हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अरनॉल्ट यांची एकूण संपत्ती 7.67 लाख कोटी एवढी आहे.
तसेच मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती 7.66 लाख कोटी ऐवढी आहे. तर जागतिक श्रीमंताच्या यादीत वॉरेन बफे बर्कशायर हे चौथ्या क्रमांकावर आहेत. मार्क झुकेरबर्ग हे या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. प्रत्येकवर्षी जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी फोर्ब्ज जाहीर करत असते. मुकेश अंबानी यांनी यंदा या यादीत नववे स्थान पटकावले आहे.