हैद्राबादच्या स्टार्टअपने आणला पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर

Thote Shubham

भारत कृषिप्रधान देश असून येथील शेतकऱ्यासाठी ट्रॅक्टर हे एक महत्वाचे साधन आहे. पण या वाहनचच्या किमती जास्त असल्याने आणि ट्रॅक्टरमुळे जादा प्रदूषण होण्याचा धोका असल्याने अनेक शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत. हैद्राबादची स्टार्टअप सेलेस्टीअल ई मोबिलिटी शेतकऱ्यांना सहकार्याचा हात देण्यास पुढे सरसावली असून त्यांनी देशातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बनविला आहे. अर्थात हा अजून प्रोटोटाईप असून २०२० च्या अखेरी या ट्रॅक्टरची ८ हजार युनिट बनविली जाणार आहेत.

 

या ट्रॅक्टरचे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे तो आकाराने छोटा आहे आणि दोन तासात पूर्ण चार्ज होतो. एका फुल चार्ज मध्ये तो ७५ किमी अंतर कापू शकतो. शिवाय त्याच्या वापराने पर्यावरणाला धोका निर्माण होत नाही. शिवाय तो दीड टनाचा भार खेचण्यास सक्षम आहे. या ट्रॅक्टरला १५० अँपीअर् लिथियम आयन बॅटरी दिली गेली आहे.

 

ती घरातील १६ अँपीअर सॉकेटवर चार्ज करता येते. फुल चार्ज होण्यासाठी तिला दोन तास लागतात. शिवाय ट्रॅक्टरला रिजनरेटीव्ह ब्रेकिंग सिस्टीम दिली गेली आहे. त्यामुळे ब्रेक लावला की बॅटरी चार्ज होते. या ट्रॅक्टरसाठी वापरले गेलेले तंत्रज्ञान तसेच सर्व सुटे भाग पूर्ण स्वदेशी आहेत. भारतीय शेतकरी आणि भारतीय शेती यांच्या गरजा लक्षात घेऊन तो तयार केला गेला आहे असा कंपनीचा दावा आहे.            

 

Find Out More:

Related Articles: