बीएस6 इंजिनसह लाँच झाली फोर्डची लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही

Thote Shubham

कार कंपनी फोर्डने आपली लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही ‘इकोस्पोर्ट’ला बीएस6 मानक इंजिनसह लाँच केले आहे. ही एसयूव्ही पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही इंजिनमध्ये लाँच करण्यात आली आहे. या एसयूव्हीच्या दोन्ही व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 8.04 लाख ते 11.58 लाख रुपये एवढी आहे.

 

नवीन इकोस्पोर्टच्या इंजिनबद्दल सांगायचे तर यात बीएस6 मानक असणारे 1.5 लीटर डिझेल इंजिन देण्यात आलेले आहे. जे 100पीएस पॉवर देते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनसोबत येते. कंपनी या व्यतरिक्त नवीन 3 सिलेंडर 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देखील देते. जे 122 पीएस पॉवर देते. पेट्रोल इंजिन हे 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशनसोबत येते. कंपनी या कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर 3 वर्ष अथवा 1 लाख किलोमीटरची वॉरंटी देत आहे.

 

फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये आधीप्रमाणेच एक्सटेरिअर आणि इंटेरियर स्टायलिंग मिळेल. इकोस्पोर्ट्सच्या काही व्हेरिएंट्समध्ये सनरुफचा देखील पर्याय आहे. सुरक्षेसाठी यात 6 एअरबॅग्स मिळतील.

 

कनेक्टिव्हिटी फीचर्सबद्दल सांगायचे तर नवीन ईकोस्पोर्टमध्ये  SYNC 3 इंफोटेनमेंट सिस्टम, 8 इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे. ड्रायव्हर असिस्टेंट फीचरमध्ये यात ऑटोमॅटिक एचआयडी हेडलॅम्प्स, डेटाइम रनिंग लाइट्स, इलेक्ट्रोकोमिक मिरर, रेन सेंसिग वायपर्स आणि पुश बटन स्टार्ट देण्यात आले आहे.

Find Out More:

Related Articles: