सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर पाक अभिनेत्रीची मुक्ताफळे

Thote Shubham Laxman

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांनी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर देशाने दु:ख व्यक्त केले. परंतु, एका पाकिस्तानी अभिनेत्रीने त्यांच्या निधनानंतर मुक्ताफळे उधळली आहेत. 

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने नाव न घेता एक ट्विट केले. वीनाने आपल्या ट्विटरवर R.I.H. लिहिले आहे. सोशल मीडियावर हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरले. H चा अर्थ HEAVEN असेही असू शकते किंवा HELL देखील होते, असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. 

परंतु, वीणाने आपल्या ट्विटसोबत एक आगीचा इमोजी देखील बनवला आहे. त्यानंतर, सोशल मीडिया युजर्सनी तिला ट्रोल करणे सुरू केले. सोशल मीडियावर एका युजरने लिहिले आहे, पाकिस्तानी आहेत, जे सुषमा स्वराज यांच्या निधनावर या प्रकारच्या प्रतिक्रिया देतात, सुषमा एक चांगल्या नेत्या होत्या आणि मानवतेला प्राधान्य देत होत्या. कदाचित हे लोक हाफिज सईदला मानत असतील. वीणाने याआधीही वादग्रस्त ट्विट केली आहेत. कुलभूषण जाधव यांच्यावर देखील आक्षेपार्ह ट्विट करून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली. 

वीणा मलिकने आपल्या ट्विटर अकाउंटवर लिहिले होते, 'कुलभूषण जाधव यांच्या प्रती कोणतीही दया दाखवण्यात येऊ नये' वीणाचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 


Find Out More:

Related Articles: