ऑस्ट्रेलियातील टी २० वर्ल्ड कप धोनी खेळणार

frame ऑस्ट्रेलियातील टी २० वर्ल्ड कप धोनी खेळणार

Thote Shubham

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० वर्ल्ड कप मध्ये माही धोनी खेळेल असा विश्वास त्याचे बालपणाचे कोच केशव बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले आयपीएल स्पर्धा समजा झाल्या नाहीत तरी टी २० वर्ल्ड कप मध्ये धोनीला संधी दिली गेली पाहिजे. कदाचित त्याची ती शेवटची स्पर्धा असू शकेल.

 

करोना प्रकोपामुळे आयपीएल सामने १५ एप्रिल ला खरोखरच होणार काय याची विशेष उत्सुकता कॅप्टन कुल धोनीच्या चाहत्यांना आहे कारण या स्पर्धेशी धोनीचे भविष्य जोडले गेले आहे. गेले कित्येक दिवस धोनी टीम बाहेर आहे आणि तो टीम इंडिया मध्ये वापसी करणार की नाही हे त्याचा आयपीएल मधील परफॉर्मन्स पाहूनच ठरणार आहे असे संकेत दिले गेले आहेत.

टीम कोच, कप्तान आणि मुख्य निवड समितीने असे संकेत दिले आहेत. आयपीएलसाठी धोनी चेन्नई सुपरकिंग्जचा कप्तान आहे आणि या स्पर्धेच्या सरावासाठी तो चेन्नईला दाखल झालाही होता मात्र करोनामुळे हे सराव शिबीर रद्द झाले आणि धोनी रांचीला परतला आहे. त्यामुळे आयपीएल रद्द झाले तर धोनीच्या वापसीचे काय ही चिंता त्याच्या चाहत्यांना आहे.

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More