टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ भारतात दाखल

Thote Shubham

येत्या रविवार पासून सुरू होत असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ भारतात दाखल झाला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना येत्या रविवारी, पाच तारखेला गुवाहाटी इथं होणार आहे. त्यानंतरचे दोन सामने अनुक्रमे 7 आणि 10 तारखेला इंदूर आणि पुण्यात होणार आहेत.

 

अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंका क्रिकेट संघ भारताविरुद्ध तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्थेत गुरुवारी येथे दाखल झाला. सुधारीत नागरिकत्व कायद्याविरुद्ध (सीएए) सुरू असलेल्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंका संघाला कडक सुरक्षा व्यवस्थेत हॉटेलमध्ये आणण्यात आले.

 
 
श्रीलंका संघात अँजेलो मॅथ्यूजचे पुनरागमन झाले आहे. तो मागील काही दिवस दुखापतींचा सामना करत होता. पण आता तो दुखापतीतून सावरला असून भारताविरुद्ध खेळण्यास सज्ज झाला आहे.तर वेगवान गोलंदाज नुवान प्रदीपला दुखापतीमुळे संघातून वगळण्यात आले आहे.
 
 
श्रीलंका संघ : लसिथ मलिंगा (कर्णधार), कुसल परेरा, दनुष्का गुणथिलाका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, ओशादा फर्नांडो, दासुन शनाका, अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल मेंडिस, वनिंदू हसरंगा, लक्षन संदकन, धनंजया डी सिल्वा, लाहिरू कुमारा, ईसूरु उदाना.
 
 
 

Find Out More:

Related Articles: