एकनाथ खडसेंसह पंकजा मुंडेही होणार आमदार

Thote Shubham

जळगाव : भाजपने महाराष्ट्रातील सत्ता गमावल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत भाजपच्या नाराज नेत्यांवर आता पक्षाकडून मोठ्या जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपने पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी अॅक्शन प्लॅन आखल्याची माहिती समोर येत आहे.

 

भाजपने विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांना तिकीट दिले नव्हते. तर परळीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यानंतर भाजपच्या राज्य पातळीवरील नेतृत्वाला या नाराज नेत्यांनी लक्ष्य केले होते. त्यानंतर भाजपकडून आता या नेत्यांच्या नाराजीची दखल घेण्यात येणार असल्याचे दिसत आहे.

 

लवकरच पंकजा मुंडे, एकनाथ खडसे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपकडून विधानपरिषदेवर संधी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जनाधार असलेले नेते पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न भाजपकडून होणार असल्याचे दिसत आहे. भाजप या नेत्यांच्या आधारे पुन्हा विधानपरिषदेत आक्रमक होणार आहे. येत्या 6 महिन्यात खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे हे तिघेही विधानपरिषदेचे आमदार होऊ शकतात.                                                                                                                

Find Out More:

Related Articles: