नैसर्गिक आपत्तीत राजकारण बाजूला ठेवून पुरपरिस्थितीचा सामना करा
राज्यातील पुरपरिस्थितीवरून राजकारणी राजकारण करताना दिसत आहेत. त्यातच आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नैसर्गिक आपत्ती राजकारण बाजूला ठेवून पुरग्रस्तांना मदक करा, असे आवाहन केले आहे. कोल्हापूर आणि सांगलीतील नागरिकांसाठी आणि जनावरांसाठी डॉक्टरांची टीम पाठवण्यात येत आहे. तसेच, औषधांचा साठाही उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या नैसर्गित आपत्तीमध्ये राजकारण न आणता, खंबीर मनाने सर्वांनीची या पूरस्थितीचा सामना केला पाहिजे. आपण आपल्या माता-भगिनींच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
राजकारण्यांनी या परिस्थितीचे राजकारण न करता मदतीचा हातम पुढे करावा असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच राष्ट्रीय आपत्तीच्या शब्दात अडकण्याची मला आवश्यकता वाटत नाही. सध्या तिथं तात्काळ मदत मिळाली पाहिजे, हेच मला वाटतंय. तेथील लोकांच्या मदतीसाठी काय गरजेचं आहे, हे ओळखून आपण काम केलं पाहिजे, बाकी मला कशात अडकायचं नाही, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. आलमट्टी धरणातील पाण्याबद्दल बोलताना, सत्य असेल ते उघड होईल, कर्नाटक सरकार काही पाप करत असेल तर तेही उघड होईल, असे ठाकरे म्हणाले. दरम्यान, तुम्ही पाहणीसाठी का गेला नाहीत ? या प्रश्नावरही उद्धव यांनी भाष्य केले. तिथ जाऊन कोरडी सहानुभूती दाखविण्याच काम मी करणार नाही. इथ राहून जे शक्य ते आणि शिवेसना काय करायचंय ते मदतकार्य करत आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.