
महाराष्ट्रात 12 तासात कोरोनाचे नवे 92 रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 1,666
दरम्यान अकोल्यात एका कोरोना रुग्णाने स्वतःवर ब्लेडने वार केले आहे. या रुग्णावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण पातूरच्या सात कोरोनाबाधित रूग्णांपैकी एक आहे. आजारपणाच्या वैफल्यातून पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रूग्णांच्या बेतालपणामूळे उपचार करणारे डाँक्टर, नर्स हैराण झाले आहेत.