Ind vs WI : दुसऱ्या सामन्यावरही पावसाचं सावट? जाणून घ्या काय आहे हवामानाचा अंदाज

Thote Shubham Laxman

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला वन-डे सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. तीन सामन्यांच्या मालिकेतला एक सामना रद्द झाल्याने दोन्ही संघ या मालिकेत बाजी मारण्याच्या दृष्टीकोनातून उतरणार आहेत. पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर आज दोन्ही संघांमधला दुसरा सामना रंगणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात पाऊस पडणार की नाही असा प्रश्न सर्व क्रिकेटप्रेमींना पडला असेल.

Accuweather या हवामान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, आजच्या दिवशी वातावरण काहीस ढगाळ असण्याची शक्यता आहे. मात्र सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता ही अत्यंत कमी आहे. त्यामुळे आज क्रिकेटप्रेमींना पूर्ण सामन्याचा आनंद घेता येईल असं दिसतंय. दरम्यान सकाळी सरावादरम्यान पावसाने हजेरी लावल्यामुळे भारतीय खेळाडूंनी इनडोअर सराव करणं पसंत केलं.

याआधी झालेल्या ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. त्यामुळे वन-डे आणि आगामी कसोटी मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Find Out More:

Related Articles: